महाराष्ट्रीय राजकारणाचे सिंहावलोकन (१८५० ते १९५०)
१९२०पर्यंत सुधारणावाद, राष्ट्रवाद व बहुजनसमाजवाद हे प्रवाह परस्परविरोधाने मार्ग आक्रमित होते. १९२०नंतर सुधारणावाद मागे हटला. पहिल्या महायुद्धाने जगात उदारमतवादाचा बळी घेतला, तसा हिंदुस्थानात सुधारणावादाचा बळी पडला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्रवादाच्या मर्यादा संपुष्टात आल्या हे सिद्ध झाले आहे. बहुजन समाजवादाचे जुने तत्त्वज्ञान टाकाऊ ठरल्यामुळे तो नवीन तत्त्वज्ञान शोधत आहे.......